मांजरी – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेशअण्णा घुले यांचे सुपुत्र अजिंक्य सुरेश घुले यांचा प्रथम स्मृतिदिन. त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी मांजरी बुद्रुक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. आमदार चेतन तुपे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
या शिबिरास आमदार अशोक पवार,
प्रदेश उपाध्यक्ष सुरेशअण्णा घुले, जिल्हा परिषदेचे सदस्य दिलीप आण्णा घुले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, पंचायत समिती सदस्य जितीन कांबळे, माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजी खलसे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अजित घुले,माजी उपसरपंच राहुल घुले, दिलीप टकले, राजेंद्र गारुडकर, प्रशांत घुले, मयूर खलसे, मंगेश मोरे, राहुल चोरघडे, सुभाष काळभोर, बापुसाहेब बोरकर, बालाजी अंकुशराव, मनोज जाधव, योगेश घुले, रविंद्र गोगावले, ग्रामपंचायत सदस्य निलेश घुले , सुधीर घुले, अभिषेक घुले, सागर बताले , अमोल निकम , शरद यादव आदिसह स्वर्गीय अजिंक्य दादा घुले प्रतिष्ठानचे कार्यकर्ते उपस्थित होते.
आमदार चेतन तुपे पाटील म्हणाले की, अजिंक्य सुरेश घुले यांनी आपल्या मांजरी भागात सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून अत्यंत मोठा मित्र व हितचिंतकांचा परिवार बांधला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्य व संघटनही त्यांनी बांधले होते. सामाजिक व राजकीय उपक्रमांत नेहमीच अग्रेसर असणाऱ्या या युवा नेत्याच्या अकाली निधनानंतर सुरेशअण्णा घुले यांनी आपले दुःख बाजूला ठेवून अजिंक्य यांच्या स्मृतींत विविध सामाजिक उपक्रम या भागात राबविले. अजिंक्य यांच्या स्मृती या लोकोपयोगी कामांतून जागविण्यात येत आहेत याबद्दल सुरेश अण्णा घुले यांचे आभार.
मांजरी बुद्रुक येथील शिवाजी महाराज चौकात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. करोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व काळजी घेतली होती. अजिंक्य घुले यांच्या मित्र परिवाराने मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान शिबिरात सहभागी होत रक्तदान केले. सुमारे ३१० जणांनी रक्तदान केले. प्रत्येक रक्तदात्यास एक टीशर्ट भेट देण्यात आला.