पुणे – जागतिक रक्तदाता या दिनाचे औचित्य साधून ‘ओम ब्लड बॅंक ‘ मंगळवार पेठ यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. .याचे उदघाटन सतीश कर्डे , सदाशिव कुंदेन, डॉ . विजय पोटफोडे यांचे हस्ते झाले. यावेळी विश्वस्त समितीचे सर्व सदस्य उपस्तित होते.
सरकारी नियमांचे काटेकोरपणे पालन करून व गर्दी टाळण्यासाठी अगोदर नाव नोंदणी घेऊन , त्या रक्तदात्यास दूरध्वनी करून त्या वेळेतच बोलवण्यात आले होते.शिबिर त्वष्टा कांसार समाज संस्थेचे श्री. महाकालिका माता मंदिर , कसबा पेठ , भाई पुरोहित चौकात पार पडले.