बारामती : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथील पांडुरंगमामा कचरे मित्र परिवाराच्या वतीने 50 बाटल्या रक्त संकलित करण्यात आले आहे. तसेच जीवनावश्यक वस्तूंचे वाटपदेखील मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले.
भारतीय जनता पक्षाचा 40 वा स्थापना दिवसाचे औचित्य साधत बारामती तालुका व शहर यांचे वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र रक्ताचा तुटवडा असल्याने रक्तदान शिबिर घेण्यात आले.
सुरक्षित अंतर ठेवून स्वच्छतेची खबरदारी घेत पन्नास बाटल्या रक्त संकलित करण्यात आले. पक्षाचे संस्थपाक श्यामा प्रसाद मुखर्जी दीनदयाळ उपाध्याय, अटल बिहारी वाजपेयी व भारमातेच्या प्रतिमेचे पूजन यावेळी करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, जे पी नड्डा,यांच्या सूचनेनुसार तसेच देवेंद्र फडणवीस व प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यकेमचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन बारामती तालुका व शहर भाजपच्या वतीने तालुकाध्यक्ष पांडुरंग कचरे व शहर अध्यक्ष सतीश फाळके यांनी केले .