सरडेवाडी येथे अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्ताने रक्तदान शिबिर संपन्न

वडापुरी – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९६ व्या जयंती निमित्ताने सरडेवाडी येथे सरपंच सीताराम जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी गावातील तरुण मित्र मंडळाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी विकास प्रतिष्ठान या संघटनेची स्थापना केली आहे.

त्या नामफलकाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषद सदस्य अभिजीत तांबिले यांच्या हस्ते संपन्न झाले तर रक्तदान शिबिराचे उद्घाटन कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मधुकर भरणे यांच्या हस्ते संपन्न झाले.

यावेळी बोलताना प्रदीप गारटकर म्हणाले की राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून युवकांनी काम करावे आपल्या वर्तणुकीतून नेहमी न्यायदानाची भूमिका पार पाडावी.या वेळी त्यांनी रक्तदान शिबिर आयोजित केल्याबद्दल आयोजकांचे कौतुक केले.

यावेळी इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मधुकर भरणे,सोलापूरचे अर्जुन सलगर, इंदापूर पंचायत समितीच्या सभापती स्वाती शेंडे, पंचायत समितीचे सदस्य सतीश पांढरे, यश उद्योग समूहाचे प्रमुख दीपक जाधव, सरडेवाडी चे सरपंच सीताराम जानकर, उपसरपंच हनुमंत जमदाडे, सदस्य रवींद्र सरडे,सतीश चित्राव, राजाराम सागर,आप्पासाहेब माने, सतीश शिंगाडे हे युवक या वेळी उपस्थित होते.

यावेळी बोलताना पुणे जिल्हा परिषद सदस्य अभिजीत तांबिले म्हणाले की रक्तदान ही काळाची गरज असून राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने सरपंच सीताराम जानकर यांनी ती योग्य वेळी अमलात आणले यामुळे अनेक लोकांचे प्राण वाचणार आहेत.

नव्याने स्थापन झालेल्या अहिल्यादेवी विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून युवकांनी शिक्षण आरोग्य रोजगार याची माहिती संकलित करून एक विकासात्मक काम उभे करावे त्यासाठी जिल्हा परिषद सदस्य म्हणून मी आपल्या पाठीशी ठाम राहील असे मत तांबिले यांनी व्यक्त केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.