पुणे – करोना विषाणू संकटामुळे रक्त दात्यांच्या संख्येत घट झाली आहे. परिणामी अनेक ठिकाणी रक्ताचा तुटवडा भासत असून पुण्यामध्ये देखील असेच चित्र निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर रविवारी पुण्यातील नांदेड सिटीमध्ये रक्तदानाचा स्तुत्य उपक्रम पार पडला.
नांदेड सिटी रेसिडेंशियल डॉक्टर अससोसिएशन,सोशल अवेरनेस कमिटी व सिनियर सिटीझन कमिटीच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.
नांदेड सिटी येथील रहिवाशांनी करोना संकट काळातही माणुसकीचे दर्शन घडवत रक्तदान शिबिरास उदंड प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळाले.
याबाबत माहिती देताना नांदेड सिटी रेसिडेंशियल डॉक्टर अससोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर अनिल दूधभाते यांनी, “करोना काळातही नांदेड सिटी येथील १०४ नागरिकांनी रक्तदानाचे कर्तव्य बजावले. यावेळी शासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करण्यात आले. त्याबद्दल या सर्व रक्तदात्यांचे सर्वांच्या वतीने मी शतशः आभार मानतो.” अशी प्रतिक्रिया दिली.
यावेळी, डॉ अनिल दुधाभाते, डॉ. हरीश गोरे, सतीश कुलकर्णी, शिरीष पाटील, रामेश थावरे, डॉ ऋषिकेश दामले, डॉ. अंबादास देवकर, डॉ. गोसावी, डॉ. मीनाक्षी रोंधे, डॉ विकास खिरसागर, डॉ. गौरी पंडित, डॉ बोरोले, डॉ आशिष पाटील, डॉ गौडा. आणि नवले हॉस्पिटलची रक्तपेढी टीम यांचे विशेष सहकार्य लाभले.