विश्रांतवाडीत रक्तदान शिबीर; नवजीवन तरुण मंडळाचा उपक्रम
विश्रांतवाडी(प्रतिनिधी) : येथील नवजीवन तरुण मंडळ व मुकुंद माधव फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले. देशातील नागरिकांचा जीव वाचविण्यासाठी “एक पाऊल पुढे येऊया, रक्तदान करूया” या संकल्पनेेतुन महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित शिबिरात ६३ रक्तदात्यांनी रक्तदान केले. संकलित झालेेेले रक्त ससून रूग्णालयाला देण्यात आले.
राज्य रक्त संक्रमण परिषद यांच्यातर्फे सर्व रक्तदात्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. शिबिर यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्रादेशिक रक्तपेढी ससून सर्वोपचार रुग्णालयाचे अधिकारी, कर्मचारी तसेच कुंदन लष्करे, संतोष पवार, अमोल मोहिते, मनोज साळुंके, अक्षय माने, चेतन धोत्रे यांच्यासह नवजीवन तरुण मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष सहकार्य केले.
करोनाच्या संकटावर मात करण्यासाठी सर्वजण वेगवेगळ्या पध्दतीने प्रशासनाबरोबरच गरजूंना सहकार्य करत आहेत. एखादा वेगळा उपक्रम घेण्याबाबत मंडळाच्या पदाधिकाऱ्यानी सूचना केली होती. त्यानुसार “रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान” असून करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. रक्ताच्या तुटवड्यावर मात करण्यासाठी शिबिर आयोजित करण्यात आल्याचे कुंदन लष्करे यांनी सांगितले.
फोटो ओळ : विश्रांतवाडी : येथील नवजीवन तरुण मंडळाच्यावतीने रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले.