पुणे : अनलॉकची प्रक्रिया सुरु होताच मोठ्या संख्येने नागरिक घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे कोरोनाची संख्या देखील वाढत आहे. दरम्यान वारंवार प्रशासनाकडून नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले जात असतानादेखील काही नागरिक बेजबाबदारपनाने वागत आहेत. त्यामुळे पोलिसांनी परत एकदा कडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
महापालिकेने जाहीर केलेल्या नवीन कंटेंमेंट परिसरात नागरिक बेशिस्तपणे वावरत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारत केवळ २४ तासात प्रतिबंधित क्षेत्रातील व परिसरातील ६९२ जणांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यात विना परवानगी फिरणारे, ट्रिपल सीट फिरणारे, सिग्नल तोडणारे, फुटपाथवर गाड्या पार्क करणाºयांचा समावेश आहे.