विविधा : सुखाचे फुलपाखरू

अश्‍विनी महामुनी 

काल माझा मुलगा मोठ्याने कविता म्हणत होता-
छान किती दिसते फुलपाखरू
या वेलीवर फुलाबरोबर
गोड फुलपाखरू…

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सकाळच्या वेळी काम करता करता मी त्याची ती कविता ऐकून काहिशी चकित झाले. ग.ह. पाटलांची हीमी स्वत: पहिलीत असताना शिकले होते. आजही मला ती चांगली आठवते. शाळेत शिकत असताना पाठ्यपुस्तकातील ग.ह. पाटलांच्या अनेक कविता कविता पाठ केल्या होत्या. आवडल्या होत्या. पण आज ओंकारच्या तोंडून छान किती दिसते फुलपाखरू ऐकताना जुन्या आठवणी ताज्या झाल्या. खरं तर त्याच्या पाठ्यपुस्तकात ही कविता नाही. तरीही तो ती म्हणत होता. मोठ्या उत्साहाने पाठ करून बरोबर चालीत म्हणत होता. सकाळच्या वेळी तो आरामखुर्चीत बसला होता. ती आरामखुर्चीही फार जुनी आहे. त्याच्या पणजोबांची. अगदी जाणीवपूर्वक जपून ठेवलेली. सर्वांनाच त्या खुर्चीत बसायला आवडते, पण पहिला हक्क ओंकारचा असतो.

फुलपाखरू ही कविता बहुतेक त्याच्या पप्पांनी त्याला शिकवली असावी. ही कविता किती जुनी आहे काही माहीत नाही. पण खूप जुनी असावी. कारण माझे वडील कधी कधी सांगतात की, त्यांना त्यांच्या वडिलांनी हे कविता लहानपणी म्हणून दाखवली होती. म्हणजे किमान साठ-पासष्ठ वर्षांपूर्वीची तरी ही कविता असली पाहिजे. ओंकार कविता म्हणतचे होता
पंख चिमुकले निळेजांभळे हालवुनी झुलते फुलपाखरू…
छान किती दिसते…

आपल्या लहानपणीच्या अनेक गोष्टी आपल्याला आयुष्यभर आठवतात. विसरू म्हणता विसरता येत नाहीत. त्यात कवितांचाही समावेश आहे. जरा कोठे काही संदर्भ लागला, की वारूळातून मुंग्या बाहेर पडाव्यात तशा आठवणी जाग्या होत जातात.आताही या फुलपाखरू कवितेने तसेच झाले.

कविता आपल्या जीवनात खरोखरच किती तरी रंग भरतात. अवीट रंग, न विटणारे रंग, सदा ताजेतवाने राहणारे. आठवण आली तरी मनाला आनंद देणारे… आपले बालपण रम्य होण्यात शाळेचा मोठा वाटा होता. तेव्हा शाळेत जाण्यात मोठा आनंद वाटायचा. शाळा चुकवावी असे चुकूनसुद्धा कधी वाटले नाही.
खरेच सुखाचे दिवस होते ते.

आता सुख म्हणजे काय हा एक प्रश्‍नच आहे. कोणाला कशात सुख वाटाचे याची काही व्याख्या नाही. सुख ही एक अनुभूती आहे. एकाच प्रसंगात ती सर्वांना मिळेलच असे नाही. मी कोठेतरी वाचले होते, की सुख हे फुलपाखरासारखे असते. त्याच्यामागे धावत सुटले तर ते हाती लागेलच असे नाही. बहुदा नाहीच लागत, पण आपण शांत राहिलो तर ते आपल्या जवळ येते. एकदा आमच्या घरात एक फुलपाखरू आले होते. अगदी वेगळेच होते. ना पूर्वी कधी पाहिले होते,. ना नंतर कधी दिसले. बरेच मोठे पंख पसरल्यानंत चांगले चारपाच इंचाए तु फुलपाखरू अगदी आकर्षक चमकदार रंगांचे होते. पण फक्‍त उडत असतना,.त्ते पंख मिटून बसले, की एखाद्या वाळलेल्या पानाप्रमाणे दिसायचे. आम्ही त्याचे फोटो काढून ठेवले आहेत. ओंकार कविता म्हणत होता,
मी धरू जाता येई न हाता दूरच ते उडते, फुलपाखरू…
छान किती दिसते…

मला वाटते या लहान मुलांच्या कवितेतही मोठे तत्त्वज्ञान भरलेले आहे. फुलपाखराप्रमाणे सुखाचाही मागे लागले की ते आपल्या हाती येत नाही. दूरच ते पळते, सुखाचे फुलपाखरू… असे म्हणावे लागते.
ग ह पाटलांची आणखी एक अगदी साधी सोपी सरल कविता होती आम्हाला. एखादी प्रार्थना असावी तशी सोपी-

देवा तुझे किती सुंदर आकाश
सुुंदर प्रकाश सूर्य देतो
चंद्र हा सुंदर चांदण्या सुंदर
चांदणे सुंदर पडे त्यांचे

आता सूर्य सुंदर प्रकाश देत नाही. चंद्र चांदण्या तशा सुंदर राहिल्या नाहीत. आकाशही सुंदर राहिलेले नाही. निळे निळे आकाश कुठे हरवले आहे. माणूस चंद्रावर गेला, चंद्राच्या न दिसणाऱ्या बाजूवरही पोहचला. पण चंद्राचे सौंदर्य, त्याची शीतलता आपण हरवून बसलो आहोत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)