अंध व्यक्तींना वैद्यकीय शिक्षणास प्रवेश देता येणार नाही: उच्च न्यायालय 

चेन्नई: मद्रास उच्च न्यायलायमध्ये विग्नेश बालाजी नामक एका अंध विद्यार्थ्याने वैद्यकीय शिक्षणास प्रवेश मिळावा यासाठी याचिका दाखल केली होती. आता न्यायालयाने या याचिकेवर आपला निर्णय दिला असून ४०% पेक्षा जास्त दृष्टिहीनता असल्यास वैद्यकीय शिक्षणास प्रवेश देता येणार नसल्याचे न्यायालयाने म्हंटले आहे.
दरम्यान विग्नेश बालाजी नामक एका अंध विद्यार्थ्याने आपणास अपंग कोट्याअंतर्गत २०१८-२०१९ या शैक्षणिक वर्षामध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळावा अशी याचिका दाखल केली होती. मात्र मद्रास उच्च न्यायालयाने या विद्यार्थ्यास वैद्यकीय शिक्षण विभाग व मेडिकल काउंसिल ऑफ इंडियाने घातलेल्या व्यंधत्वासंबंधित नियम व अटी पूर्ण करू शकत नसल्याच्या कारणास्तव प्रवेशासंदर्भात कोणतीही न्यायालयीन मदत होऊ शकणार नसल्याचे सांगितले आहे.
तत्पूर्वी याचिकाकर्त्या विध्यार्थ्याच्या मते अपंग विध्यार्थ्यांसाठी राखीव असलेल्या १२० जागांपैकी केवळ २० जागा भरल्या असल्याने उर्वरित जागा भराव्या यासाठी त्याने याचिका दाखल केली होती. मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायाधीश एस वैद्यनाथन यांनी याबाबत निर्णय देताना “विग्नेश बालाजी हा विद्यार्थी नक्कीच प्रतिभावंत आहे त्याचे १२वि इयत्तेतील व नीट परीक्षेचे निकाल पाहता त्याची प्रतिभा स्पष्टपणे दिसते, अशा प्रतिभावंत विध्यार्थ्यांना प्रवेश नाकारणे दुर्भाग्याचे आहे परंतु नियम व अटींपुढे जाऊन न्यायालय देखील निर्णय घेऊ शकत नाही” असे वक्तव्य केले.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)