सासवड- करोनाचा वाढता प्रसार कमी करण्यासाठी सासवड शहरात लॉकडाऊन झाल्यापासून धन्य बाजार बंद करण्यात आला होता. मात्र, आता शहर अनलॉक झाल्याने बुधवार (दि. 5 ऑगस्ट) पासून धान्य बाजार पुन्हा सुरु करण्यात होणार असल्याची माहिती नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव मिलिंद जगताप यांनी दिली.
बाजार समितीतील संपूर्ण आवारामध्ये औषध फवारणी करणार आहे. तर शेतकऱ्यांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, त्याचबरोबर आपला धान्य माल बुधवारपासून बाजारात आणावा व ग्राहकांनी देखील नियमांचे पालन करीत धान्य खरेदी करावे, असे आवाहन सभापती मुरलीधर ठोंबरे यांनी केले आहे.