रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यास धक्‍काबुक्‍की

नगर: जिल्हा रुग्णालयामधील वैद्यकीय उपचार करणाऱ्या डॉक्‍टरला धक्काबुक्की करून रूग्णालयात नियुक्‍तीला असलेल्या पोलिसांना देखील एकाने शिवीगाळ केली. शुक्रवारी (दि.14) सायंकाळी पाच वाजता ही घटना घडली.
याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात संदीप हरिभाऊ शेंडेकर (रा. चिचोंडी पाटील, ता. नगर) याच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, शुक्रवारी सायंकाळी जिल्हा रूग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक रामचंद्र खटके यांनी मारामारीत जखमी झालेल्या संदीप शेंडेकर याच्यावर वैद्यकीय उपचार केले. वैद्यकीय उपचार पूर्ण केल्यानंतर शेंडेकर याने तुम्ही माझ्यावर उपचार कसा काय केला, असे म्हणून मोठमोठ्याने आरडाओरड सुरू केली. डॉक्‍टरांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता शेंडेकर याने डॉ. खटके यांना धक्काबुक्की केली. तसेच शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. हा गोंधळ सुरू झाल्यानंतर दवाखान्यातील इतर कर्मचाऱ्यांनी रुग्णालयातील पोलिसांना बोलावून घेतले. शेंडेकर याने पोलिसांनाही शिवीगाळ केली.

याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात डॉ. अशोक खटके यांच्या फिर्यादीवरून संदीप शेंडेकर याच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणणे व महाराष्ट्र मेडिकल सर्व्हिस पर्सन हिंसा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.