मुंबई – केंद्रसरकारने ‘पबजी’ या लोकप्रिय गेमिंग ऍपबरोबरच चीनच्या तब्बल 118 मोबाईल ऍपवर बंदी घातल्यामुळे पब्जीप्रेमींमध्ये नाराजीचे सूर उमटले होते. मात्र, ‘पबजी’ लाही भारी पडेल असा अस्सल भारतीय बनावटीचा ‘फौजी’ हा गेमिंग ऍप आता बाजारात येण्यास सज्ज झाला आहे.
विशेष म्हणजे, आपल्या वेगळ्या धर्तीच्या भूमिकांमुळे चर्चेत राहणारा अष्टपैलू अभिनेता अक्षयकुमार हा गेम लाँच करतोय. काल (दि. २५) दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर अक्षयने या गेमचा ऑफिशल प्रोमो लाँच केला आहे. पबजी गेमच्या तोडीस तोड ठरू शकणारे फौजी गेम बेंगळुरू येथील एन-कोर गेम्स नावाच्या कंपनीने तयार केले आहे.
Today we celebrate the victory of good over evil, and what better day to celebrate our Fearless and United Guards, our FAU-G!
On the auspicious occasion of Dussehra, presenting the #FAUG teaser.@nCore_games @BharatKeVeer @vishalgondal #AtmanirbharBharat #StartupIndia pic.twitter.com/5lvPBa2Uxz— Akshay Kumar (@akshaykumar) October 25, 2020
या टीझरच्या पहिल्याच सीनमध्ये गलवान खोऱ्यात उड्डाण करणारे हेलिकॉप्टर दिसत आहेत. अक्षय कुमारने आपल्या पोस्ट मध्ये म्हंटले कि, असत्यावर सत्याचा विजय असा आजचा दिवज आहे. निडर आणि एकतेचं प्रतिक असलेल्या फौजींसाठी जल्लोष साजरा करण्यासाठी यापेक्षा चांगला कोणता दिवस असू शकतो? दसऱ्याच्या या शुभ मुहूर्तावर फौजीचा प्रोमो सादर करत आहे.