उत्तर प्रदेशात दुकानात स्फोट; 13 जणांचा मृत्यू, 6 जण जखमी

भडोही – उत्तर प्रदेशातील भडोही शहरात दुकानात झालेल्या स्फोटात 13 जणांचा मृत्यू झाला, तर 6 जण जखमी झाले आहेत. या स्फोटामुळे दुकानाशेजारील 3 घरेही कोसळली आहेत. ही घटना शनिवारी दुपारी घडली.
कोसळलेल्या घरांच्या ढिगाऱ्याखाली काही जण गाडले गेल्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना शोधण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे.

भडोही शहरातील रोहता बाजार या ठिकाणी हा स्फोट झाला. स्फोट झालेल्या दुकानाच्या मालकाची ओळख पटली असून कालियार मन्सुरी असे त्याचे नाव असल्याचे जिल्हा दंडाधिकारी राजेंद्र प्रसाद यांनी सांगितले. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार मन्सुरी बेकायदेशीरपणे फटाक्‍यांचे दुकान चालवत होता.

मन्सुरी यांचा मुलगा इरफान याची दुकानाच्या मागील बाजूला कार्पेट फॅक्‍टरी आहे. यातील काही कामगार जखमी झाल्याचीही शक्‍यता प्रसाद यांनी वर्तविली आहे. फॉरेन्सिक तज्ञांचे पथक आणि “एनडीआरएफ’ही घटनास्थळी तातडीने दाखल झाले आहे असे प्रसाद यांनी सांगितले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.