नेवासा – मनोज जरांगे यांची आंतरवाली सराटी येथे आज नेवासा तालुक्यातील मराठा समाजाच्या एका शिष्ट मंडळाने भेट घेतली. नेवासा तालुक्यात मराठासमाजाची घोंगडी बैठक घेण्याची मागणी यावेळी जरांगे यांच्याकडे करण्यात आली.
जरांगे यांची शिवसंग्राम पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेशराव शेटे यांच्या नेत्तृत्वाखाली भेट घेतली. यावेळी त्यांनी नेवासा तालुक्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी मनोज जरांगे यांना तालुक्यात घोंगडी बैठक घ्यावी असा आग्रह शिष्टमंडळाने केला.
यावेळी त्यांनी हे आग्रहाचे निमंत्रण मान्य केल्याची माहीती दिली. तालुक्यातील प्रत्येक गावात लवकरच मराठा सेवक निर्माण करा असेही त्यांनी यावेळी स्पष्ट शब्दात सांगून या बैठकीच्या आयोजनाच्या तयारीला लागा असे आवाहनही त्यांनी या शिष्ठ मंडळाला केले.
त्यामुळे नेवासा तालुक्यात लवकरच मनोज जरांगे यांची घोंगडी बैठक आयोजित केली जाणार आहे. असं संदेश लवकरच सर्व मराठा बांधवांना देण्यात येईल असे या भेटीवेळी जिल्हाध्यक्ष सुरेश शेटे,संभाजी माळवदे,संतोष काळे,रावसाहेब घुमरे यांनी माहीती देतांना सांगितले.