पुणे – जुन्या वादातून एका ज्येष्ठ नागरिकाने शेजारच्यावर ब्लेडने वार केले. याप्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
फिर्यादी नागेश नाना अडागळे (रा. पाटील इस्टेट, शिवाजीनगर) आणि 62 वर्षीय आरोपी एकाच ठिकाणी राहायला आहेत.
फिर्यादीची दोन महिन्यापूर्वी आरोपीच्या मुलाबरोबर भांडणे झाली होती. त्याचा राग मनात धरून आरोपीने फिर्यादी नागेश व त्याच्या आई-वडिलांना रविवारी शिवीगाळ केली. वाद वाढल्यावर फिर्यादीच्या वडिलांना मारहाण केली.
ही भांडणे सोडविण्यासाठी फिर्यादी नागेशमध्ये पडले असता आरोपीने त्यांच्या गालावर व मानेवर ब्लेडने वार केले. याप्रकरणाचा तपास पोलीस हवालदार पाटणे करत आहेत.