Pooja Sawnat | मराठी अभिनेत्री पूजा सावंत अभिनयासह तिच्या नृत्यामुळे ओळखली जाते. मागील वर्षी फेब्रुवारीमध्ये तिने सिद्धेश चव्हाणसोबत लग्नगाठ बांधली. यानंतर तिने लग्नानंतरचा पहिला मकर संक्रांत सण आपल्या कुटुंबासोबत साजरी केली आहे. पूजाने तिचा नवरा सिद्धेशबरोबर ऑस्ट्रेलियामधील राहत्या घरात पारंपरिक पद्धतीने हा सण साजरा केला.
पूजाने पहिल्या मकरसंक्रांतीला काळ्या रंगाची पैठणी नेसली होती. हलव्याचे दागिने घालत तिने मराठमोळा साज केला तर सिद्धेशनेही काळ्या रंगाचा कुर्ता घातला होता. पूजा सिद्धेशच्या पहिल्या मकर संक्रांतीला तिचे आई, बाबा, भाऊ आणि बहीण उपस्थित होते.
व्हिडिओमध्ये आई त्यांना ओवाळताना दिसत आहे. आई-बाबांचे आशीर्वाद घेत त्यांनी हा सण आनंदाने साजरा केला. यावेळी पूजाने नवऱ्यासोबत फोटोशूट केले आहे. पूजाच्या या व्हिडीओवर सध्या चाहते आणि कलाकारांकडून प्रेमाचा शुभेच्छांचा आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे. Pooja Swanat |
View this post on Instagram
पूजाचा नवरा सिद्धेश ऑस्ट्रेलियातील एका फायनान्स कंपनीत आहे. दोघांनी 28 फेब्रुवारी 2024 ला लग्नगाठ बांधली. दोघांच्या लग्नाचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते.
हेही वाचा:
फ्लिपकार्टचा धमाकेदार सेल सुरू, आयफोनला खूपच स्वस्तात खरेदीची संधी; पाहा ऑफर्स