ब्लॅक रोझ इंडस्ट्रीज; रसायनांच्या क्षेत्रात आत्मविश्वासाची पावले

ब्लॅक रोझ इंडस्ट्रीज दुग्धउद्योग, कागद उद्योग, कापड, तेल आणि वायू, औषध, ऊर्जा प्रकल्प, खत प्रकल्प, साखर, अन्न आणि पेये, खाणकाम, वाहन उद्योग, मद्य निर्मिती, कातडीकाम, खाद्यतेले, सिरॅमिक आणि मार्बल अशा विविध क्षेत्रांसाठी आवश्‍यक ती स्पेशालिटी केमिकल्सचे उत्पादन आणि पुरवठा करत आहे. कंपनी अपारंपरिक ऊर्जेच्या क्षेत्रातही काम करत असून गुजरात आणि राजस्थानमध्ये कंपनीच्या पवनचक्क्‌या आहेत. त्याद्वारे प्रदूषण कमी करण्यास हातभार लावणे हा कंपनीचा उद्देश आहे. 2020 मध्ये संपलेल्या आर्थिक वर्षात कंपनीची वार्षिक उलाढाल 25,314.14 कोटी रुपये होती आणि निव्वळ नफा 1,995.38 रुपये इतका होता.

ब्लॅक रोझ इंडस्ट्रीज ही रसायनांच्या क्षेत्रात काम करणारी कंपनी आहे. विविध रसायनांचे उत्पादन, वितरण आणि निर्यातीच्या क्षेत्रात कंपनी काम करते. शेतीतील सायनांसाठी, टायर, डाय, कॅटॅलिस्ट, परफ्युम, पॉलिमर अशा विविध गोष्टीसाठी लागणारी विशेष रसायने पुरवण्याचे काम करते. बेंझिलअमाईन, हायड्रोब्रोमिक ऍसिड, हायड्रो क्विनॉन, अल्फा पिकोलिन, गॅमा पिकोलनि अशा 28 पेक्षा जास्त रसायनांचा समावेश होतो. परफॉर्मन्स केमिकल्सच्या वर्गवारीत कंपनी घट्ट जोडून ठेवणाऱ्या चिकटवर्गीय विविध उत्पादनांसाठी, सायनोऍक्रिलिट अडेसिव्हज, स्टॅबिलायझर आणि अँटीऑक्‍सिडंटमध्ये वापरली जाणारी रसायने, रबर केमिकल्स आणि टायरवरील प्रक्रियेसाठी वापरली जाणारी रसायने, थर्मोप्लॅस्टिक रबर्स, इपॉक्‍सी हार्डनर अशा उत्पादनांची निर्मिती व पुरवठा करते.

आजच्या घडीला कंपनी दुग्धउद्योग, कागद उद्योग, कापड, तेल आणि वायू, औषध, ऊर्जा प्रकल्प, खत प्रकल्प, साखर, अन्न आणि पेये, खाणकाम, वाहन उद्योग, मद्य निर्मिती, कातडीकाम, खाद्यतेले, सिरॅमिक आणि मार्बल अशा विविध क्षेत्रांसाठी आवश्‍यक ती स्पेशालिटी केमिकल्सचे उत्पादन आणि पुरवठा करत आहे. रेझिन सिमेंट, दातांसाठीचा बॉन्डिग एजन्ट, प्रायमर, जेल डिसेन्सिटायझर, दातात भरण्यासाठीचे अडेसिव्ह रेझिन कंपनी तयार करते. कंपनीचे बिलट्रीट हे कोग्युलंट हे पिण्याच्या पाण्यावर प्रक्रियेसाठी तसेच सांडपाण्यावर प्रक्रियेसाठी वापरले जाते. हाताळण्यास सोपे आणि विद्राव्य म्हणून त्याची ओळख आहे.

ब्लॅक रोझ इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीची स्थापना 1990 मध्ये एशिया फॅब लिमिटेड म्हणून झाली. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून गुजरातमधील झागडिया येथे कंपनीचा उत्पादन प्रकल्प आहे. महाराष्ट्रात भिवंडी आणि गुजरातमध्ये मोरबी आणि वापीला कंपनीची गोदामे आहेत. जानेवारी 2020 मध्ये कंपनीने पॉलिअक्रिलअमाईडच्या वाढीव उत्पादनासाठी विस्तारीत प्रकल्पाची उभारणी करून तो सुरू केला. ऑक्‍टोबर 2019 मध्ये कंपनीने ब्रिलडेन्ट हा दंतविषयक उत्पादनांचा व्यवसाय सुरु केला. जपानमधील सन मेडिकल कंपनीकडून सुपर बॉन्ड सीअँडबी हे वैशिष्टयपूर्ण उत्पादन आयात केले जाते. त्याचबरोबर रेझिन सिमेंट, बॉन्डिंग एजन्टस्‌, प्रायमर्स अशी विविध उत्पादने मागवली जातात.

कंपनीची रसायने वितरणाची यंत्रणा भक्कम आहे. विक्री आणि अन्य पायाभूत सुविधा भक्कम असल्याने विविध उद्योगांमधील हजारो ग्राहकांना हवे ते उत्पादन उपलब्ध करून दिले जाते. औद्योगिक वापरासाठीच्या फॅब्रिक्‍सचे उत्पादन कंपनीतर्फे महाराष्ट्रातील कोल्हापुरात केले जाते. ही उत्पादने देशात विकण्याबरोबरच परदेशातही निर्यात केली जातात.

कंपनी अपारंपरिक ऊर्जेच्या क्षेत्रातही काम करत असून गुजरात आणि राजस्थानमध्ये कंपनीच्या पवनचक्क्‌या आहेत. त्याद्वारे प्रदूषण कमी करण्यास हातभार लावणे हा कंपनीचा उद्देश आहे. खरे तर कृष्णगुलाब म्हणजे काळ्या रंगाचा गुलाब निसर्गात अस्तित्वात नसतो. कंपनीसाठी काळा रंग हा प्रतीकात्मक आहे. काळा रंग हा प्रचंड जिद्दीचे प्रतीक आहे आणि गुलाबातून काटेरी मार्गावरील सौंदर्य प्रकट होते, असे कंपनीचे तत्वज्ञान आहे.

2020 मध्ये संपलेल्या आर्थिक वर्षात कंपनीची वार्षिक उलाढाल 25,314.14 कोटी रुपये होती आणि निव्वळ नफा 1,995.38 रुपये इतका होता. नफा वाढवण्याच्या दिशेने साधनसंपत्तीचे कार्यक्षम आणि प्रभावी व्यवस्थापन, गेल्या दोन वर्षांमध्य रिटर्न ऑन ऍसेट (आरओए) मध्ये झालेली वाढ ह्या जमेच्या बाजू आहेत. कंपनीच्या निव्वळ नफ्यातही वाढ होताना दिसत आहे. अत्यल्प कर्ज, मागील दोन तिमाहीमध्ये वाढलेली उलाढाल, गेल्या दोन तिमाहीमध्ये वाढलेला निव्वळ नफा, प्रवर्तकांनी एकही शेअर गहाण ठेवलेला नसणे ह्या कंपनीसाठी जमेच्या बाजू आहेत.

जगभरात आता रसायनांसाठी भारताकडे पाहिले जाऊ लागले आहे. पर्यावरणविषयक जागृती आणि चीनमधील उत्पादनांच्या वाढत्या किंमती लक्षात घेता भारतातील रसायन उद्योग आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जम बसवू लागला आहे. ब्लॅक रोझ इंडस्ट्रीदेखील अऩेक उत्पादनांची निर्यात करत आहे. विविध उद्योग क्षेत्रांसाठी रसायनांच्या उत्पादनांचे आणि पुरवठ्याचे काम करणाऱ्या या कंपनीत दीर्घकाळासाठी गुंतवणूक करणे चांगला परतावा देणारे ठरू शकते.
शुक्रवारचा बंद – 170.00 रुपये

– सुहास यादव

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.