‘यांना’ आवरा…लॉकडाऊनमध्येही रेल्वे तिकिटांचा काळाबाजार

जवळपास 57 लाख रुपयांची तिकिटे एजंटांकडून जप्त

पुणे रेल्वेचे आरक्षित तिकीट काढण्यासाठी अनेकदा तिकीट एजंट प्रवाशांची फसवणूक करतात. अशा गुन्ह्यांवर रेल्वे सुरक्षा दलाकडून विशेष लक्ष ठेवण्यात येत असून, यावर्षी ऑगस्टपर्यंत आरपीएफने सुमारे 2 हजारांहून अधिक तिकिटे जप्त केली आहेत.

 

रेल्वेने विना तिकीट प्रवास करणाऱ्या नागरिकांवर रेल्वेकडून तर अवैध तिकीट एजंटांवर रेल्वे सुरक्षा दलाकडून कारवाई करण्यात येते. रेल्वे प्रवास करताना आरक्षित तिकीट असावे, यासाठी नागरिक अनेकदा एजंटांद्वारे तिकीट आरक्षित करतात

 

मात्र यामध्ये एजंटांकडून बनावट तिकीट देणे, जास्त पैसे आकारणे, वेबसाइटचा गैरवापर करणे आदी प्रकार घडतात. सध्या केवळ विशेष रेल्वे धावत असताना देखील फसवणुकीचे प्रकार घडल्याचे चित्र असून, याबाबत आरपीएफच्या पुणे विभागाने एजंटांवर कारवाई केली आहे.

सन 2020 मध्ये ऑगस्ट महिन्यापर्यंत आरपीएफ अवैध तिकीट प्रकरणी 54 घटनांमध्ये 72 व्यक्तींवर कारवाई केली आहे. त्यांच्याकडून 56 लाख 61 हजार 534 रुपयांची 2,289 तिकिटे जप्त करण्यात आली आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.