‘सीएए’ रौलेट ऍक्‍टसारखा काळा कायदा : मातोंडकर

पुणे -“नागरिकत्व कायदा हा रौलेट ऍक्‍टसारखा काळा कायदा आहे. हा कायदा केवळ मुस्लिमांच्या विरोधात नाही, तर गरिबांच्या विरोधात आहे. त्यामुळे त्याला विरोध केलाच पाहिजे. हा वणवा सुरू असताना शांत राहून चालणार नाही. केवळ संसद म्हणजे देश नाही. नागरिक म्हणजे देश आहे, याची जाणीव आपण ठेवली पाहिजे,’ असे मत अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर यांनी व्यक्‍त केले.

महात्मा गांधी पुण्यतिथी आणि हुतात्मा दिनानिमित सीएए, एनआरसी, एनपीआर विरोधी अहिंसात्मक जनआंदोलन या विषयावर महाराष्ट्र गांधी स्मारक निधीतर्फे आयोजित सभेत त्या बोलत होत्या. यावेळी महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी, बिशप थॉमस डाबरे, सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड उपस्थित होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.