वृत्तसंस्था – देशात करोनाची परिस्थिती अतिभयंकर असताना म्युकरमायकोसीस आजाराने डोके वर काढले आहे. त्यामुळे आधीच करोनाचा सामना करत असताना या नवीन संकटाला देशाला तोंड द्यावे लागत आहे. यासंदर्भात कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारला धारेवर धरले आहे. ”केवळ भारतातच करोना सोबत ब्लॅक फंगस महामारी आहे. या महामारीचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच ताळी-थाळी वाजविण्याची घोषणा करतील.”
मोदी सिस्टम के कुशासन के चलते सिर्फ़ भारत में कोरोना के साथ-साथ ब्लैक फ़ंगस महामारी है। वैक्सीन की कमी तो है ही, इस नयी महामारी की दवा की भी भारी कमी है।
इससे जूझने के लिए PM ताली-थाली बजाने की घोषणा करते ही होंगे।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 22, 2021
राहुल गांधी म्हणाले की, ”केवळ भारतातच करोना सोबत ब्लॅक फंगस महामारी आहे. देशात लसीचा तुटवडा आहे. या नवीन महामारीसाठी सुद्धा औषधांचा तुटवडा असून या महामारीचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच ताळी-थाळी वाजविण्याची घोषणा करतील.” असे खोचक व्टिट राहूल गांधी यांनी केले आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करणाऱ्या भारतात सध्या तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण सुरू आहे. मात्र, सध्या लशीचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. यामुळे अनेक ठिकाणी लसीकरण थांबविण्याची वेळ आली आहे. करोना सोबत देशात आता म्युकरमायकोसीस आजाराची सुद्धा परिस्थिती गंभीर होत चालली आहे. म्युकरमायकोसीचे सुद्धा अनेक रुग्ण मिळत असून या आजामुळे अनेकांचा जीव जात आहे.