अंमळनेरमध्ये धरणग्रस्तांनी मुख्यमंत्र्यांना दाखवले काळे झेंडे

जळगाव – अंमळनेर येथे प्रचारसभा घेण्यासाठी आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शुक्रवारी धरणग्रस्तांच्या रोषाचा सामना करावा लागला. धरणग्रस्तांनी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर निदर्शने केली असून त्यांनी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडेही दाखवले. या प्रकरणी पोलिसांनी सात ते आठ जणांना ताब्यात घेतले आहे.

अंमळनेर येथे शुक्रवारी दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारसभा घेतली. या प्रचारसभेसाठी मुख्यमंत्री पोहोचले असता धरणग्रस्तांनी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर निदर्शने केली. गेल्या 20 वर्षांपासून पडलसे धरणाचे काम खोळंबले आहे. या प्रकल्पाचे काम मार्गी लावावे, यासाठी धरणग्रस्त आक्रमक असून धरणाचे काम त्वरित पूर्ण करावे, अशी त्यांची मागणी आहे. या आंदोलनाप्रकरणी पोलिसांनी सात ते आठ जणांना ताब्यात घेतले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.