गांधीजींच्या कर्मभूमीत भाजपचा वरचष्मा 

गुजरातमधील गांधीनगर हा लोकसभा मतदारसंघ 1989 पासून भारतीय जनता पक्षाकडे आहे. हा मतदारसंघ सुरुवातीला कॉंग्रेसकडे होता. 1967, 1971 मध्ये येथून कॉंग्रेस आघाडीचे सोमचंद भाई सोलंकी, 1977 मध्ये जनता पक्षाचे पुरुषोत्तम मावलकर, 1980 मध्ये कॉंग्रेसचे अमृत पटेल, तर 1984 मध्ये कॉंग्रेसचे जी.आई. पटेल विजयी झाले होते. 1989 मध्ये या मतदारसंघातून सर्वप्रथम भारतीय जनता पक्षाच्या शंकरसिंह वाघेला यांनी हा मतदारसंघ भाजपकडे खेचून आणला. यानंतर या मतदारसंघातून लालकृष्ण अडवाणी हे 1991, 1998, 1999, 2004 आणि 2009 असे तब्बल पाच वेळा लोकसभेवर निवडून गेले आहेत. 1996 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाचे विजय पटेल विजयी झाले होते.

गांधीनगर लोकसभा मतदारसंघात गांधीनगर उत्तर, कलोल, सानंद, घटोलडिया, बेजालपूर, नारनपुरा आणि साबरमती अशा सात विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. यापैकी मेहसाणा जिल्ह्यातील कलोल आणि अहमदाबाद जिल्ह्यातील आनंद या दोन विधानसभा वगळता इतर पाचही विधानसभांवर भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व आहे.

2009 मध्ये झालेल्या निवडणुकीत लालकृष्ण अडवाणी यांनी एकूण मतांच्या तब्बल 54.89 टक्‍के मते खेचताना 4,34,044 मते मिळवली होती, तर त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले कॉंग्रेसचे सुरेश पटेल यांना 3,12,297 मते मिळाली होती. 2004 मध्ये लालकृष्ण अडवाणींनी इथे “शायनिंग इंडिया’चा नारा देत प्रचार केला होता. त्यावेळी अडवाणींना 61 टक्‍के मते म्हणजेच 5,16,120 इतके मतदान झाले होते. 2014 मध्ये या मतदारसंघातून लालकृष्ण अडवाणी यांनी जणू विक्रमच केला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)