Sindhudurg District : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील नगरपरिषद आणि महापालिका निवडणुकीत भाजपचे अनेक उमेदवार बिनविरोध निवडून आले. भाजपच्या बिनविरोध पॅटर्नची राज्यभरात जोरदार चर्चा झाली. आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतही भाजपने बिनविरोध पॅटर्न कायम ठेवला आहे. सिंधूदुर्ग जिल्ह्यात भाजपने निवडणुकीअगोदर विजयाचा गुलाल उधळला आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत पाच सदस्य आणि पंचायत समितीत सहा सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. या विजयाने सिंधूदुर्ग जिल्ह्यात भाजपने निवडणुकीअगोदर विजयाची जोरदार मुसंडी मारली आहे. शिंदेसेनेचा एक उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे. हेही वाचा : US Winter Storm : अमेरिकेत हिमवादळामुळे कहर ; वीजपुरवठा खंडित, १३,००० उड्डाणे रद्द यामुळे सिंधूदुर्ग जिल्ह्यात ठाकरेसेनेला मोठा धक्का असून, मतदानापूर्वीच महायुतीने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अशा एकूण मिळून अकरा जागा जिंकत विजयाचा जल्लोष साजरा केला आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपचा बिनविरोध पॅटर्न बिनविरोध निवडीची आकडेवारी खालीलप्रमाणे. जिल्हा परिषद- खारेपाटण जि. प.- प्राची इस्वलकर (भाजप) जाणवली जि. प.- रूहिता राजेश तांबे (शिवसेना शिंदे गट) पडेल जि. प.- सुयोगी रवींद्र घाडी (भाजप) बापर्डे जि. प.- अवनी अमोल तेली (भाजप) बांदा जि. प.- प्रमोद कामत (भाजप) पंचायत समिती- बिडवाडी:- संजना संतोष राणे (भाजप) वरवडे:- सोनू सावंत (भाजप) पडेल:- अंकुश यशवंत ठूकरूल (भाजप) नाडण:- गणेश सदाशिव राणे (भाजप) बापर्डे:- संजना संजय लाड (भाजप) कोकिसरे:- साधना सुधीर नकाशे (भाजप) हेही वाचा : Mumbai Crime News : धक्का लागल्याचा राग की आणखी काही ? प्राध्यापकाला संपवणाऱ्या आरोपीला बेड्या; मुंबईतील धक्कादायक घटना