अरुणाचलच्या विधानसभेतही भाजपचा निर्विवाद विजय

इटानगर,(अरुणाचल प्रदेश): अरुणाचल प्रदेशात लोकसभेबरोबरच विधानसभेच्याही निवडणुकांमध्येही भाजपला सहज विजय मिळाला. 60 सदस्यांच्या विधानसभेमध्ये आतापर्यंत उपलब्ध झालेल्या निकालांनुसार भाजपने 37 जागा जिंकल्या आहेत. तर विरोधी कॉंग्रेसला केवळ 4 जागांवर विजय मिळवता आला आहे. पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचल या एकमेव प्रादेशिक पक्षाने 1, तीन अपक्ष आणि नॅशनल पीपल्स पार्टीचे 4 उमेदवार विजयी झाले आहेत.

विजयी झालेल्या प्रमुख नेत्यांमध्ये भाजपचे मुख्यमंत्री पेमा खंडू यांनी सलग तिसऱ्यांदा विजय मिळवला आहे. उपमुख्यमंत्री चौना मेईन यांनीही विजय मिळवला. भाजपला महत्वाच्या दोन जागांवर मात्र पराभव स्वीकारावा लागला आहे. या निवडणूकीचा संपूर्ण निकाल निवडणुक आयोगाकडून अधिकृतपणे उपलब्ध झालेला नसला, तरी विधानसभेमध्ये भाजपचे सरकार स्थापन होणार हे आता निश्‍चित झाले आहे.

2014 च्या विधानसभेच्या निवडणुकीत कॉंग्रेसने 42 जागा जिंकल्या होत्या. भाजपने 11, पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचलने 5 आणि 2 अपक्ष उमेदवार विजयी झाले होते.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.