नवी दिल्ली : 8 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, 3 आणि 4 फेब्रुवारीला भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ सभा घेणार आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री हर्षवर्धन यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
पंतप्रधान तीन फेब्रुवारी रोजी सीबीडी मैदानावर प्रचार सभा घेणार आहेत. दुपारी अडीच वाजता हि सभा होईल. तर दुसरी सभा 4 फेब्रुवारीला रामलीला मैदानात होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते मागील आठवड्यापासून भाजप उमेदवारांचा प्रचार करीत आहे.
दरम्यान विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोप होत असून नागरिकत्व कायदा आणि बेरोजगारी, जामिया हिंसाचारावरून दिल्लीत राजकारण चांगलेच तापले आहे.