वाघोली(प्रतिनिधी) : हवेली तालुका युवा मोर्चाचे अध्यक्ष अनिल सातव व वाघोली शहराचे अध्यक्ष केतन जाधव यांनी वाघोली सह तालुक्यातील केलेल्या भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या नियुक्तीमुळे भाजपची ताकद हवेली तालुक्यात वाढली असल्याचे गौरवोद्गार पुणे जिल्हा भाजप अध्यक्ष गणेश भेगडे यांनी व्यक्त केले.
वाघोली तालुका हवेली येथे भारताचे सर्वात यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त व पंडित स्व. दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त सेवा समर्पण सप्ताह कार्यक्रम निमित्ताने भारतीय जनता पार्टी,वाघोली शहर कार्यकारणी,वाघोली शहर महिला, हवेली तालुका महिला,हवेली तालुका युवा मोर्चा यांच्या कार्यकारणी पदांची 64 मान्यवरांना नियुक्ती पत्रे वाटप माजी आमदार व पुणे शहर भाजप अध्यक्ष जगदीश मुळीक व पुणे जिल्हा अध्यक्ष गणेशजी भेगडे यांच्या हस्ते देण्यात आली.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे बोलत होते. कार्यकारणीचे नियोजन व कार्यक्रमाचे आयोजन युवा मोर्चा हवेली तालुकाध्यक्ष अनिल सातव पाटील व वाघोली शहर अध्यक्ष केतन जाधव यांनी केले होते . यावेळी भाजपा पुणे उपाध्यक्ष दादासाहेब सातव पाटील यांचा वाढदिवस देखील साधेपणाने साजरा करण्यात आला. वाघोली येथे पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीमुळे सर्वात मोठा पक्षीय कार्यक्रम झाला असल्याबद्दल पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी देखील आयोजकांचे कौतुक केले.
यावेळी सरचिटणीस धर्मेंद्र खांडरे,माजी सभापती रोहिदास उंद्रे, हवेली तालुका भाजपा अध्यक्ष संदीप भोंडवे, महाराष्ट्र युवा मोर्चा सदस्य गणेश कुटे, सरचिटणीस सुदर्शन चौधरी,
पुणे जिल्हा उपाध्यक्ष सुनील कांचन व प्रवीण काळभोर, युवा मोर्चा सरचिटणीस संदीप सातव, व्यापार आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष जयप्रकाश सातव, पुणे जिल्हा भाजपचे सचिव सचिन जाधव, हवेली तालुका पंचायत समिती सदस्य श्याम गावडे, पुणे जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्ष शरद आव्हाळे,विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अमोल शिवले , पूनमताई चौधरी , केसनंद माजी सरपंच हिरामण हरगुडे, सरपंच नितीन गावडे, अनिल हरगुडे ,सदस्य दत्ता हरगुडे,उपसरपंच रवी वाळके, मांजरी सरपंच स्वप्नील उंद्रे, उपसरपंच राहुल सातव ,तालुका उपाध्यक्ष दिनेश झांबरे, सरचिटणीस गौरव झुरुंगे ,बाबासाहेब हरगुडे, धनाजी हरगुडे ,युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष उमेश मोरे ,दिनेश हरगुडे ,विजय जाचक, गणेश येवले , हवेली तालुका भाजप महिला आघाडी अध्यक्षा सुप्रियाताई गोते, सुनिता आढाव,वंदना शिवले,स्नेहल कुलकर्णी, विद्याताई पाटील,अमृताताई वाळुंज, मनीषाताई मोरे, सोमाताई धर व भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.