शाहू-फुले-आंबेडकरांचे विचार मोडण्याची भाजपाची नीती: अजित पवार

इंदापूर: भाजपा-शिवसेना सरकारने लोकांना अनेक योजनांमार्फत खोटी आश्वासने दिली. त्या योजनांना बहुरंगी नावे दिली मात्र त्याचा उपयोग जनतेला झालाच नाही ही खंत आहे. या सरकारचा शेती व दुष्काळाशी काडीमात्र संबंध नाही, यांच्या काळात आत्महत्येचा आकडा १५ हजारावर गेला. पिकविमा योजनेमार्फत विमा कंपनीचे पितळ सोन्याचे करून शेतकऱ्यांची चेष्टा युती सरकराने केली, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार म्हणाले.

ते समोर म्हणाले, मोदी यांच्या सरकारने पाच वर्षात देशाच्या लबाड उद्योगपती १५ कुटुंबियांचे पैसे माफ केले. मात्र संयुक्त महाआघाडीने देशाच्या करोडो शेतकऱ्यांचे पैसे माफ करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे

शाहू-फुले-आंबेडकरी विचार मोडण्याची भाजपाची नीती आहे. अशा फसव्या आणि जातीचे राजकारण करणाऱ्या सरकारला बाजूला काढण्यासाठी देशातील समविचारी पक्ष एकत्र आले, आता १३६ कोटी जनतेने यावर विचार करून सत्तापालट करण्याची भूमिका बाळगावी, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.