महाआघाडीचा भाजपला ‘दे धक्‍का’

लोणावळा नगरपरिषदेत विरोधक वरचढ : तळेगावात भाजप “इच्छुक’ राष्ट्रवादीच्या तंबूत


भाजप सदस्याचा विरोधकांना “हात’ : शिवसेनेला दोन सभापती पदाची “लॉटरी’


भाजप, कॉंग्रेसची प्रत्येकी एका सभापती पदावर समाधान


आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत भगत यांचा ऐनवेळी राष्ट्रवादीत प्रवेश

लोणावळा – लोणावळा नगरपरिषदेच्या सभापती पदाच्या निवडीत शुक्रवारी (दि. 17) सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या गटाला धक्‍का देत विरोधी पक्ष असलेल्या शिवसेनेने महत्वाच्या दोन सभापती पदांवर बाजी मारली. शिवसेनेला संलग्न असलेल्या एका अपक्षाने सभापती, तर दुसऱ्याने उपसभापती पद मिळविल्याने सत्ताधारी गटाला मोठा दणका बसला आहे.

सत्ताधारी गटातील भाजपाला व कॉंग्रेसला प्रत्येकी एका सभापती पदावर समाधान मानावे लागले. सत्ताधारी गटातील भाजपाच्या एका सदस्याने विरोधी गटाला मतदान केले. यामध्ये दोन सदस्य गैरहजर राहिल्याने मोठी उलथापालथ झाली.

तहसीलदार मधुसूदन बर्गे यांच्या पीठासनाखाली सभापती पदाची निवडणूक लोणावळा नगरपरिषदेच्या सभागृहात झाली. या वेळी प्रभारी नगराध्यक्ष श्रीधर पुजारी, मुख्याधिकारी सचिन पवार व सदस्य उपस्थित होते.

नियोजित कालावधीमध्ये शिक्षण क्रीडा व सांस्कृतिक कार्य समिती सभापती पदाकरिता कॉंग्रेस पक्षाच्या आरोही तळेगावकर यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

महिला व बालकल्याण समिती : सभापती पदाकरिता भाजपाच्या अपर्णा बुटाला यांचा, तर उपसभापती पदाकरिता अपक्ष नगरसेविका अंजना कडू यांचे एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

बांधकाम समिती : (सुनील इंगूळकर, सभापती) – या समितीच्या सभापती पदाकरिता शिवसेनेचे सुनील इंगूळकर व आरपीआयचे दिलीप दामोदरे यांचे दोन अर्ज दाखल झाले होते. माघारीच्या वेळेपर्यत कोणीही अर्ज मागे न घेतल्याने सभापती पदाकरिता मतदान घेण्यात आले. यामध्ये सुनील इंगूळकर यांना इंगूळकर यांच्यासह भाजपाच्या नगरसेविका गौरी मावकर, शिवसेनेच्या कल्पना आखाडे, व अपक्ष अंजना कडू या चार जणांनी मतदान केले, तर दिलीप दामोदरे यांना दामोदरे यांच्यासह कॉंग्रेसच्या संध्या खंडेलवाल व सुवर्णा अकोलकर या तीन जणांनी मतदान केले. भाजपा नगरसेवक भरत हारपुडे मतदानास गैरहजर राहिले. यामुळे सुनील इंगूळकर यांची सभापती पदावर निवड जाहीर करण्यात आली.

स्वच्छता वैद्यक व सार्वजनिक आरोग्य समिती : शिवसेनेच्या सिंधू परदेशी व भाजपाचे देविदास कडू याचे सभापती पदाकरिता अर्ज दाखल झाले होते. माघार कालावधीपर्यत कोणीही अर्ज मागे न घेतल्याने झालेल्या मतदानात सिंधू परदेशी यांना त्यांच्यासह भाजपाच्या गौरी मावकर, शिवसेनेच्या शादान चौधरी व अपक्ष अंजना कडू यांनी मतदान केले. तर देविदास कडू यांना कडू यांच्यासह कॉंग्रेसचे संजय घोणे व पूजा गायकवाड यांनी मतदान केले. भाजपाचे भरत हारपुडे हे मतदानाला
गैरहजर राहिले.

पाणी पुरवठा व जलनि:स्सारण समिती : सभापती पदाकरिता अपक्ष नगरसेविका सेजल परमार व कॉंग्रेसचे नगरसेवक सुधीर शिर्के यांनी अर्ज भरले होते. नियोजित कालावधीत माघार न झाल्याने सभापती पदाकरिता मतदान घेण्यात आले. यामध्ये सेजल परमार यांना परमार यांच्यासह भाजपाच्या गौरी मावकर, शिवसेनेच्या शादान चौधरी व कल्पना आखाडे यांनी मतदान केले, तर कॉंग्रेसचे सुधीर शिर्के यांना शिर्के यांच्यासह भाजपाच्या रचना सिनकर व कॉंग्रेसच्या सुवर्णा अकोलकर यांनी मतदान केले. भाजपा नगरसेविका जयश्री आहेर या मतदानाला गैरहजर राहिल्या.

नियोजन समिती : श्रीधर पुजारी (पदसिद्ध अध्यक्ष) सदस्य म्हणून ब्रिंदा गणात्रा, रचना सिनकर, निखिल कविश्‍वर, संजय घोणे, माणिक मराठे, मंदा सोनवणे. स्थायी समिती : नगराध्यक्षा सुरेखा जाधव (पदसिद्ध अध्यक्ष) : सदस्य श्रीधर पुजारी, सुनील इंगूळकर, आरोही तळेगावकर, सेजल परमार, सिंधू परदेशी, अपर्णा बुटाला, पूजा गायकवाड, राजू बच्चे, नितीन आगरवाल यांची निवड करण्यात आली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here