पुण्यात भाजपला “सांगली’चा धसका?

पुणे – सांगलीतील राजकीय घडामोडींचा धसका घेत, पुण्यात भाजपने स्थायीच्या निवडणुकीसाठी सावधगिरीचा पवित्रा घेतला आहे. दगाफटका टाळण्यासाठी समितीच्या सर्व सदस्यांना पक्षातर्फे व्हिप बजावण्यात आला आहे.

स्थायी समिती अध्यक्ष निवडणुकीसाठी सोमवारी अर्ज भरण्यात येणार आहे. त्यामुळे पक्षाकडून याबाबत खबरदारी घेण्यात आली आहे. सांगलीच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीत भाजपचे नगरसेवक फोडत राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसने भाजपला धक्का दिला.

आता दि. 5 मार्चला पुणे स्थायी समिती अध्यक्षपदासाठी आणि शिक्षण समितीच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. 16 सदस्य असलेल्या स्थायी समितीत भाजपचे 10 सदस्य आहेत. त्यामुळे ही निवडणूक औपचारिकता ठरणार आहे.

विद्यमान अध्यक्ष हेमंत रासने यांना पुन्हा अध्यक्षपदी नेमण्याचा निर्णय जवळपास घेतला आहे. त्यामुळे पक्षात धुसफूस सुरू असून नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादीकडून सांगली पॅटर्न तर राबवला जाणार नाही ना, अशी चर्चा आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.