चंद्रकांतदादांच्या उपस्थितीत भाजपचा मेळावा

कराड  -विधान परिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार संग्राम संपतराव देशमुख आणि पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातील भाजपा पुरस्कृत उमेदवार जितेंद्र दत्तात्रय पवार यांच्या प्रचारार्थ भाजपा कराड दक्षिणच्यावतीने सोमवार दि. 23 नोव्हेंबर रोजी प्रचार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. कराड येथील पंकज मल्टिपर्पज हॉलमध्ये सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्याला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहून मार्गदर्शन करणार आहेत. 

या मेळाव्याला सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर, मदनराव मोहिते, य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले, भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले, नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांच्यासह भाजपाचे नगरसेवक, जिल्हा व पंचायत समितीचे पदाधिकारी उपस्थिती असणार आहे.

या मेळाव्याला पदवीधर, शिक्षक, पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन भाजपाचे तालुकाध्यक्ष पैलवान धनंजय पाटील आणि कराड शहराध्यक्ष एकनाथ बागडी यांनी केले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.