नवी दिल्ली – करोनाची दुसरी लाट देशात धुमाकूळ घालत आहे. त्यामुळे करोना संसर्गाची भीती सर्वांच्या मनात बसली आहे. कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाणही झपाट्याने वाढताना दिसत आहे. देशात कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. वाढत्या संख्येमुळे अनेक राज्यात ऑक्सिजन अभावी अनेकांना प्राण गमवावे लागत आहेत.
अशातच गुजरातमधील व्यापाराचे मुख्य केंद्र असलेल्या सुरतमध्ये करोनाच्या प्रकोपामुळे हाहाकार उडाला आहे. याठिकाणी रुग्णांच्या वाढत्या संख्येबरोबर मृतांचा आकडाही वाढला आहे. मृतांची संख्या प्रचंड असल्याने सुरतच्या स्मशानभूमींमध्ये 24 तास अंत्यसंस्कार सुरु आहेत. ही बातमी ताजी असतांनाच भाजपा नेते स्वत:ची लोकप्रियता वाढवण्यावर भर देत असल्याची बातमी समोर येत आहे.
सोशलवर व्हायरल फोटो सुरत येथे भाजपकडून कापूर-ओवा-लवंगीचे मिश्रण असलेल्या आयुर्वेदिक औषधाच्या पॅकेटवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो, भाजपचे प्रचार चिन्ह, प्रदेशाध्यक्षांचे नाव आणि ‘नमो ऑक्सिजन आयुर्वेदिक बुस्टर’ अशा नावासह दिले जात आहे.
व्हायरल फोटोमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील, मुख्यमंत्री रुपाणी, उपमुख्यमंत्री नितीन पटेल, स्थानिक आमदार आणि शहर अध्यक्ष अशी नावे या पाकिटावर छापलेली आहेत. सोशल मीडियावर हे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे सोशलवर सध्या या फोटोवरून भाजप पक्षावर टीका केली जात आहे. फोटोवरून सोशलवर नेटकऱ्यानी पब्लिसिटी साठी फोटो छापणे नेत्यांना शोभत नाही असं लोकं म्हणत गुजरात मॉडेलची सुद्धा खिल्ली उडवली जात आहे.
भाजप माजी आमदाराचा पब्लिसिटीसाठी अजब फंडा; ऑक्सिजन सिलेंडरवर लावले स्वत:चे फोटो
तत्पूर्वीही,गुजरात येथे अमरेली भाजपाचे माजी आमदार हिरा सोलंकी यांनी जिल्हा प्रशासनाच्या परवानगीनं २५ बेड्सचे कोविड सेंटर उभारले. त्यात जिल्हा रुग्णालयाकडून पाठवलेले रुग्णांचे उपचार केले जातात. मात्र यांनी ऑक्सिजन सिलेंडरवर स्वत:चा फोटो लावून त्याचा पुरवठा सुरू केला. सोशल मीडियावर हे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले सोशलवर सध्या या फोटोवरून भाजप पक्षावर टीका केली गेली.