गोपीनाथ मुंढेंचे भाजपला विस्मरण : मोदींनी टाळले गोपीनाथ गडाचे दर्शन

धनंजय मुंढे यांचा आरोप                                                                                                 मुंबई : सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विधानसभेच्या प्रचारानिमित्त महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. गुरुवारी बीड मधील परळीत मोदींच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होत. या सभेत नरेंद्र मोदींना आणि भाजपला गोपीनाथ मुंढेंचा विसर पडला असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंढे यांनी केला आहे.

आज मोदींच्या सभांसाठी छापलेल्या जाहिरातीत स्व. गोपीनाथ मुंडे साहेब यांचा साधा फोटोसुद्धा नव्हता. मोदींनी गोपीनाथ गडाकडेही पाठ फिरवली. माझ्या जीवनातील हा सर्वात वाईट दिवस होता.अशा शब्दात धनंजय मुंढे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. दिवंगत लोकनेत्याचा अपमान कसा करायचा हे भाजपला चांगलेच जमते. मोदींच्या सभांसाठी छापलेल्या जाहिरातीत दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचा साधा फोटोही नव्हता. मोदींनी गोपीनाथ गडाकडेही पाठ फिरवली. माझ्या जीवनातील हा सर्वात वाईट दिवस होता. असे म्हणत भाजपला गोपीनाथ मुंढेच विसर पडला असल्याचे धनंजय यांनी म्हटले आहे.

दरम्यान मोदींनी परळीत झालेल्या सभेत “दोन महिन्यांपूर्वी कलम 370 हटविल्याने न्याय मिळाला आहे. हा निर्णय घेण्यात आला तेव्हा विरोधकांनी याला प्रचंड विरोधात झाला. भाजप पक्षाच्या जन्मापासून कलम 370 ला विरोध करत आहे. हा राजनीतीचा निर्णय नसून देशहिताचा निर्णय आहे, असे म्हणत मोदींनी परळीत गर्जना केली. तसेच या निवडणुकीत रेकॉर्ड ब्रेक विजय मिळेल असा विश्वासही व्यक्त केला आहे. ”

परळी मतदार संघात ग्रामविकास मंत्री पंकजा मुंढे आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंढे हे एकमेकांच्या विरोधात रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष या मतदार संघावर लागले आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.