मुंबई – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांनी बलात्कार केल्याचा आरोप एका तरुणीने केला. नातेवाईक असलेल्या तरुणीने ओशिवरा पोलीस ठाण्यात या संदर्भात तक्रार दाखल केली आहे. यावर मंत्री धनंजय मुंडे यांनी खुलासा केला आहे. मात्रा आता या मुद्दावरून राजकारण तापण्यास सुरुवात झाली आहे. भाजपनेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी धनंजय मुंडे यांच्या मंत्रीमंडळातील उपस्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
रेणू शर्मा नावाच्या एका महिलेने (या रेणु शर्मा या करुणा शर्मा यांच्या सख्या लहान बहीण आहेत) स्वतः त्यांच्या खात्यावरून ट्विट केले आहे. माझ्यावर करण्यात आलेले सर्व आरोप खोटे आणि मला ब्लॅंकमेल करणारे असल्याचे धनंजय मुंडे यांनी स्पष्टीकरण दिले.
मुंडे पुढे म्हणाले की, करूणा शर्मा नावाच्या एका महिलेसोबत मी 2003 पासून परस्पर सहमतीने संबंधांत होतो. ही बाब माझे कुटुंबीय, पत्नी व मित्र परिवार यांना अवगत होती. परस्पर सहमतीच्या संबंधामधून आम्हाला एक मुलगा व एक मुलगी अशी दोन मुले झाली. दोन्ही मुलांना मी माझे नाव दिले आहे. शाळेच्या दाखल्यापासून ते सर्व कागदपत्रांमध्ये या मुलांना पालक म्हणून माझेच नाव आहे, ही मुले माझ्यासोबतच राहतात. माझे कुटुंबीय, पत्नी आणि माझी मुले यांनी देखील या मुलांना कुटुंबीय म्हणून सामावून घेतले असून स्वीकृती दिलेली अस, मुंडे यांनी म्हटले आहे.
Having Relationship with 3 Women, Minister Dhananjay Munde must stay out from Maharashtra Cabinet till He gets Clean
3 महिलांशी संबंध असलेले मंत्री धनंजय मुंडे यांनी सद्य परिस्थिति स्पष्ट, होईपर्यंत महाराष्ट्र मंत्रिमंडळातून बाहेर रहावे @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis pic.twitter.com/rsKS5H0kfU
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) January 12, 2021
3 महिलांशी संबंध असलेले मंत्री धनंजय मुंडे यांनी सत्य परिस्थिती स्पष्ट होईपर्यंत महाराष्ट्र मंत्रिमंडळातून बाहेर रहावे, याबाबतचा व्हिडीओ किरीट सोमय्या यांनी ट्वीट केला आहे. तसेच त्या व्हिडीओमधून सोमय्या यांनी मुंडे यांच्यावर टीकास्त्र सोडून जे आरोप होत आहेत, त्यामुळे महाराष्ट्राच्या अस्मिता, संस्कृतीला धक्का पोहचला असून जोपर्यंत धनंजय मुंडे यांची आरोपातून मुक्तता होत नाही, तोपर्यंत त्यांना मंत्रीमंडळात राहण्याचा अधिकार त्यांना नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे.