मुंबई – सध्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो असलेलं एक चॉकलेट प्रचंड व्हायरल होत आहे. गुजरात भाजपाने हे नवं चॉकलेट बाजारात आणलं आहे.
विशेष म्हणजे, मोदींचा फोटो असलेलं हे चॉकलेट गरीब आणि कुपोषित मुलांसाठी भरपूर पोषक तत्व असलेलं चॉकलेट आहे. असं भाजपकडून सांगण्यात आलं आहे.
स्वस्थ भारत के निर्माण के लिए देश में महिलाओं एवं बच्चों का योग्य पोषण होना बेहद आवश्यक है। देश के यशस्वी प्रधानमंत्री श्री @narendramodi जी की प्रेरणा से महिलाओं तथा बच्चों के लिए एक स्वास्थ्यवर्धक चॉकलेट… pic.twitter.com/tm6wphFzxB
— Dushyant Singh (@DushyantDholpur) April 4, 2022
या पॅकेटवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो लावण्यात आला असून या एनर्जी बारमधल्या सामग्रीची माहितीही देण्यात आली आहे. भाजपाचे खासदार दुष्यंत सिंग यांनी या न्यूट्रिशन बारबद्दल माहिती दिली आहे. त्यांनी हे चॉकलेट खातानाचा फोटोही सोशल मीडियावर शेअर केला आहे.