नवी दिल्ली – दिल्लीत काँग्रेसच्या पत्रकार परिषदेत चांगलाच गोंधळ पहायला मिळालं. मिळालेल्या माहितीनुसार, कांग्रेस प्रवक्ता पवन खेड़ा हे पत्रकारांशी बोलत असताना अचानक एक व्यक्ती पत्रकार परिषेदत घुसला. हातात तिरंगा झेंडा घेऊन आलेला व्यक्तीने यावेळी ‘वंदे मातरम’ आणि ‘भारत माता की जय’च्या घोषणा दिल्या. अचानक झालेल्या प्रकाराने कॉंग्रेस प्रवक्ते पवन खेड़ा काही गोंधळात पडले होते. त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी त्या व्यक्तीला बाहेर काढून लावले.
#WATCH Delhi: A man interrupts the media briefing by Congress Spokesperson Pawan Khera, shouts “Yogi Adityanath ko Ajay Singh Bisht kehna Bharatiya sanskriti ka apmaan hai, Vande Mataram, Bharat mata ki jai” pic.twitter.com/pRDNd7WKsc
— ANI (@ANI) May 15, 2019
याबाबत सविस्तर वृत्त असे की, दिल्लीत काँग्रेसच्या पत्रकार परिषदेत चांगलाच गोंधळ पहायला मिळालं. कांग्रेस प्रवक्ता पवन खेड़ा हे पत्रकारांशी बोलत असताना अचानक एक व्यक्ती पत्रकार परिषेदत घुसला. हातात तिरंगा झेंडा घेऊन आलेला व्यक्तीने यावेळी योगी आदित्यनाथ यांना अजय सिंह बिष्ट म्हणणं म्हणजे भारतीय संस्कृतीचा अपमान आहे.’ आपलं म्हणणं मांडत त्यानं ‘वंदे मातरम’ आणि ‘भारत माता की जय’च्या घोषणा दिल्या. अचानक झालेल्या प्रकाराने कॉंग्रेस प्रवक्ते पवन खेड़ा काही गोंधळात पडले होते. त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी त्या व्यक्तीला बाहेर काढून लावले.