Eknath Shinde : पुढील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे धनुष्यबाण चिन्ह राहणार नाही. धनुष्यबाण चिन्ह गोठवलं जाईल ,असा मोठा दावा ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. येत्या काही दिवसांमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर निवडणूक आयोगाकडून धनुष्यबाण हे चिन्ह गोठवले जाईल. याची भीती असल्यामुळेच सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी वारंवार पुढे ढकलली जात आहे. शिवसेना पक्ष व चिन्ह सुनावणीबाबत वारंवार तारखा दिल्या आहेत. पुढच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपर्यंत एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेना पक्ष राहणार नाही, असे भाकीत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केले आहे. पुढे ते म्हणाले, एकनाथ शिंदे यांनी सरन्यायाधीशांना वाकून पुष्पगुच्छ दिला आहे तरी त्याचा फायदा होणार नाही. भारतीय संविधानातील 10व्या परिशिष्टानुसार धनुष्यबाण हे चिन्ह गोठवले जाील. एकनाथ शिंदे यांना अमित शाह यांनी चालवायला दिलेल्या कंपनीचे शटर डाऊन होईल. धनुष्यबाण चिन्ह गोठवलं जाईल – संजय राऊत मुंबईत सभागृहात विरोधी बाकावर 100 पेक्षा जास्त नगरसेवक असणं हे सत्ताधाऱ्यांना आव्हान आहे. या निवडणुकीत मराठी माणूस ठाकरेंच्या मागे आहे हे दाखवून दिलं, असं संजय राऊत म्हणाले. Eknath Shinde : ‘ईडी, सीबीआय आणि पोलिसांच्या जोरावर भाजप कारभार करते’ भाजपवर टीका करत संजय राऊत म्हणाले, “माझ्या हातात राज्याची आणि या देशातील विशिष्ट खात्यांची सत्ता द्या. मी भाजपचे 15 तुकडे करुन दाखवतो. कुठून आणि कसे तुकडे झाले, हे भाजपलाही कळणार नाही. ईडी, सीबीआय आणि पोलिसांच्या जोरावर भाजप कारभार करत आहे. भाजपकडे स्वत:चे कुठे काय आहे? त्यांच्या पक्षात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि आमची लोकं भरली आहेत. आमच्या हातात सत्ता आल्यावर एकनाथ शिंदे यांच्यासारख्या विकृतीचे अस्तित्वही राहणार नाही,” असेही संजय राऊत यांनी म्हटले. अंतिम सुनावणी होण्याची शक्यता शक्यता दरम्यान, निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष फुटीनंतर एकनाथ शिंदे यांच्या गटाला पक्षाचं नाव आणि चिन्ह सोपवलं होतं. तर सुप्रीम कोर्टाने आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल विधानसभा अध्यक्षांना घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार विधानसभा अध्यक्षांनी सुनावणी घेतली. या सुनावणीत एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला दिलासा मिळाला होता. मात्र शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्हावर निवडणूक आयोगाने जो निकाल दिलाय, तसेच आमदार अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात खटला सुरु आहे. या प्रकरणाला सातत्याने तारीख पे तारीख मिळताना दिसत आहेत. पुढच्या महिन्यात कदाचित यावर अंतिम सुनावणी होण्याची शक्यता आहे. पण त्याआधीच संजय राऊतांनी मोठा दावा केला. Eknath Shinde : हेही वाचा : Pune Mayor Election : नवा महापौर कोण? ६ फेब्रुवारीला होणार फैसला; भाजपमधील ‘या’ महिला नेत्यांची नावे चर्चेत