मुंबई : कीडा या ट्विटर हँडलवर तानाजी चित्रपटातील दृष्यांना मॉर्फिंग करुन छत्रपती शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी चेहरा लावण्यात होता. तर तानाजी मालुसरे यांच्या चेहऱ्यांवर गृहमंत्री अमित शहा यांचा चेहरा लावण्यात आला होता. त्यावर आता भाजपने स्पष्टीकरण दिले आहे. भाजपचा या पोष्टशी काहीही संबंध नसल्याचे भाजपने स्प्ष्ट केले आहे.
पॉलिटिकल कीडा या कुठल्याशा ट्विटर अकाऊंटवरून पोस्ट झालेल्या व्हीडिओचा भाजपशी कुठलाही संबंध नाही, असे भाजपने ट्विट केले आहे.
तो भाजपाचा अधिकृत व्हिडीओ नाही. तो कुठेही प्रचारात वापरलेला नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी कुणाचीही तुलना करण्याचे भाजप कधीही समर्थन करणार नाही, असे स्पष्टीकरण भाजपतर्फे ट्विटरवर देण्यात आले आहे.
पॉलिटिकल कीडा या कुठल्याशा ट्विटर अकाऊंटवरून पोस्ट झालेल्या व्हीडिओचा भाजपाशी कुठलाही संबंध नाही.
तो भाजपाचा अधिकृत व्हीडिओ नाही. तो कुठेही प्रचारात वापरलेला नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी कुणाचीही तुलना करण्याचे भाजपा कधीही समर्थन करणार नाही. pic.twitter.com/Eagro0J7qz— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) January 21, 2020
दरम्यान अजय देवगण आणि सैफ अली खान यांची मुख्य भूमिका असलेला तान्हाजी : द अनसंग वॉरिअर चित्रपट सध्या राज्यासह देशभरात धुमाकुळ घालत आहे. मात्र, या चित्रपटातील काही प्रसंगाला मॉर्फिंग करत छत्रपती शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नरवीर तानाजी मालुसरे यांच्या चेहऱ्यावर अमित शहा यांचा चेहरा लावण्यात आला आहे. यावर सर्वच स्तरातून टीका केली जात आहे. तर आता छत्रपती संभाजी राजे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
छत्रपती संभाजी राजे म्हणाले कि, पुस्तक झालं आता व्हिडीओ आला. अशोभनीय, असहनिय तसेच निंदनीय. संबंधित पक्षाने यावर आपली भूमिका स्पष्ट करावी. केंद्र सरकारने चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करावी. आम्हा शिवभक्तांसाठी महाराज सर्वस्व आहेत. शिवभक्तांच्या भावना तीव्र आहेत. सरकारची जबाबदारी आहे, आमच्या भावनांची कदर करत अश्या गोष्टी होऊ नयेत यासाठी दक्षता घ्यावी. सर्व राजकीय पक्षांना-कार्यकर्त्यांना विनंती आहे, कोणीही गलिच्छ राजकारणासाठी महाराजांच्या प्रतिमेचा गैरवापर करु नये, असे त्यांनी म्हंटले आहे.