भाजपची थेट तालिबानशी तुलना, पंतप्रधानांवर ईर्षा करत असल्याचा आरोप; प्रचारसभेत ममतांचा ‘रोखठोक’ अंदाज

कोलकाता – पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांमध्ये तृणमूल काँग्रेस व भाजपदरम्यान संघर्ष पाहायला मिळाला होता. निवडणुकांनंतरही हा संघर्ष सुरूच असून दोन्ही पक्षाचे नेते एकमेकांवर आगपाखड करण्याची एकही संधी सोडत नाहीत. पश्चिम बंगाल येथे येत्या ३० सप्टेंबरला पोटनिवडणुका होणार असून भवानीपूर विधानसभा मतदारसंघातून ममता बॅनर्जी निवडणूक लढवत आहेत.

भवानीपूर येथे एका प्रचारसभेमध्ये बोलताना, ममता बॅनर्जी यांनी आज भाजपची तुलना थेट तालिबानशी केली आहे. तसेच तृणमूल पक्ष एकटाच भाजपला हरवण्यासाठी समर्थ असल्याचं देखील त्यांनी म्हंटल आहे.

“रोम येथे जागतिक शांतता परिषद होती. मला या कार्यक्रमाचे आमंत्रण देण्यात आले होते. इटलीने मला या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी खास परवानगी दिली होती. मात्र केंद्र सरकारने एका राज्याच्या मुख्यमंत्र्याने या कार्यक्रमास उपस्थित राहणे योग्य नसल्याचं कारण पुढे करत मला परवानगी नाकारली.” असा दावा ममता बॅनर्जी यांनी यावेळी बोलताना केला.

त्या पुढे म्हणाल्या, “तुम्ही मला थांबवू शकणार नाही. मला काही परदेशवाऱ्यांची हौस नाही. मात्र हे देशाची प्रतिष्ठा वाढवण्यासंदर्भात होत. नरेंद्र मोदी तुम्ही हिंदूंबाबत बोल्ट असता, मात्र मी देखील एक हिंदू महिला आहे. तर मग तुम्ही मला का अडवलं? तुम्ही सरळ सरळ माझी ईर्षा करता.”

“आपल्यालाच आपलं स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी लढावं लागणार आहे. तालिबानी भाजप देश चालवू शकत नाही. तृणमूल काँग्रेस एकटाच भाजपचा प्रभाव करायला समर्थ आहे. खेला भवानीपूर येथून सुरु होईल आणि आपण संपूर्ण देश जिंकल्यानंतरच पूर्ण होईल.” असं देखील त्या यावेळी बोलताना म्हणाल्या.        

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.