भाजपने शिवसेनेला ईडीची भीती दाखवल्यानेच युतीचा निर्णयः विखे पाटील.

पुणे: भाजपने शिवसेनेला ईडीची भीती दाखवल्यामुळे शिवसेना युतीसाठी तयार असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते  राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. विखे पाटील पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. तसेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी देखील शिवसेनेवर टीका केली. शिवसेना सत्तेसाठी लाचार असल्याचे त्यांनी म्हटले.

आगामी लोकसभा निवडणूक जवळ आल्याने आता शिवसेना-भाजप युतीचा प्रश्न सुटण्याच्या मार्गावर आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी आज मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतील आणि युती संदर्भात चर्चा केली. आतापर्यंत शिवसेना पक्षप्रमुख यांनी स्वबळावर लढण्याचे सांगितले होते. तसेच सामानाच्या अग्रलेखातून देखील भाजप सरकारवर तीव्र शब्दात टीका करण्यात आली. त्यामुळे शिवसेनेच्या या भूमिकेवर राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)