पुलवामा हल्ला हा गोध्रासारखाच भाजपचा कट – शंकरसिह वाघेला 

नवी दिल्ली – पुलवामा हल्ला हा भाजपचा गोध्रासारखाच कट असल्याचा गंभीर आरोप गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिह वाघेला यांनी केला आहे. पुलवामा हल्ल्यात वापरण्यात आलेली कार ही गुजरात पासिंगची होती. याच गाडीत आरडीएक्स होते, असा दावा वाघेला यांनी केला. वाघेला यांच्या आरोपामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान, भाजप नेते असलेले वाघेला हे आता राष्ट्रवादीत आहेत.

शंकरसिह वाघेला म्हणाले कि,  निवडणुका जिंकण्यासाठी भाजप सरकार दहशतवादाचा वापर करत आहे. मागील ५ वर्षांत अनेक दहशतवादी हल्ले झाले आहेत. तसेच बालाकोट एअर स्ट्राइकमध्ये एकही जण मारला गेला नाही. बालाकोट एअर स्ट्राइक हा एक पूर्वनियोजित कट होता. असे घडणारच होते, असे वाघेला यांनी म्हंटले आहे.

पुलवामा हल्ल्याबाबत गुप्तचर यंत्रणांकडून इशारा मिळाल्यानंतरही सरकारने काळजी घेतली नाही, आणि जर तुमच्याकडे बालाकोटमधील दहशतवादी तळांबाबत माहिती होती तर तुम्ही आधीच कारवाई का केली नाही. तुम्ही पुलवामा हल्ल्यासारख्या घटनेची वाट पाहत होते काय, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. निवडणुका जिंकण्यासाठीच भाजपने हा प्रकार घडवला आहे, असा पुनरुच्चारही त्यांनी केला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.