सिलेब्रिटी उमेदवारांवर भाजपची भिस्त 

ंकुंपणावरचे मतदार आकर्षित होण्याचा विश्‍वास

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी देताना भाजपने अनेक सिलेब्रिटींवर भिस्त ठेवली आहे. त्या प्रसिद्ध चेहऱ्यांमुळे (सिलेब्रिटी) कुंपणावरचे मतदार आपल्याकडे आकर्षित होतील, असा विश्‍वास त्या पक्षाला वाटत आहे.
भाजपने मंगळवारी बॉलीवूड अभिनेता सनी देओल याला पंजाबच्या गुरदासपूरमधून निवडणूक रिंगणात उतरवले. त्याशिवाय, ज्येष्ठ अभिनेत्री किरण खेर यांना चंडीगढमधून पुन्हा उमेदवारी देण्यात आली. त्याआधी चित्रपट क्षेत्रातील इतर कलाकारांनाही भाजपने उमेदवार म्हणून पसंती दिली. त्यानुसार उत्तरप्रदेशच्या मथुरामधून हेमा मालिनी तर रामपूरमधून जयाप्रदा नशीब आजमावत आहेत. बाबूल सुप्रियो यांना पश्‍चिम बंगालमधून तर मनोज तिवारी यांना दिल्लीतून रिंगणात उतरवण्यात आले आहे.

उत्तरप्रदेशच्या गोरखपूरमधून रवि किशन यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्याशिवाय, माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर पूर्व दिल्ली मतदारसंघातून निवडणूक मैदानात उतरला आहे. स्थानिक नेत्यांऐवजी सिलेब्रिटींना पसंती देण्यामागे कुठल्याच पक्षाकडे न झुकलेल्या मतदारांना आपल्याकडे वळवणे हा भाजपचा उद्देश असल्याचे मानले जात आहे. अर्थात, सिलेब्रिटींना उमेदवारी देण्यामागची भूमिका भाजपने स्पष्ट केली आहे. भाजपशी दीर्घ काळापासूून संबंध असलेल्या सिलेब्रिटींनाच आम्ही उमेदवारी दिली आहे. त्यांच्यामुळे पक्षाचा पाया विस्तारण्यास मदत होईल, असे भाजपचे प्रवक्ते जी.व्ही.एल. नरसिंह राव यांनी म्हटले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.