लोकसभेच्या २५० जागांवर भाजपचे उमेदवार निश्चित : आज होणार घोषणा?

नवी दिल्ली – भारतीय जनता पक्ष मोठ्या प्रतीक्षेनंतर आणि मॅरेथॉन बैठकीनंतर लोकसभा निवडणुकीसाठी आज पहिली उमेदवारांची यादी जाहीर करण्याची शक्यता आहे. भाजपने २५० उमेवारांची नावे अंतिम केल्याची चर्चा आहे. पहिल्या यादीत उत्तरप्रदेशसाठी ३५ उमेदवारांच्या नावाची घोषणा होऊ शकते.

केंद्रीय निवडणुकीच्या बैठकीत उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासमवेत दोन उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा आणि केशव मौर्य, भाजप अध्यक्ष महेंद्र नाथ पांडेयही उपस्थित होते. या बैठकीनंतर रामपूर लोकभेच्या जागेवरून जया प्रदा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. तसेच बिहारच्या १७ जागा आणि महाराष्ट्राच्या २१ जागांवरही आज निर्णय होण्याची शक्यता आहे. बंगालच्या उमेदवारीसाठीही भाजपच्या बैठकीत चर्चा झाली असून ४२ जागांमधील २७ जागांसाठी उमेदवार निश्चित झाल्याचे समजते आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत छत्तीसगढमधील ११ जागांमधील पाच जागांवर उमेदवार निश्चित झाले आहेत.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.