गुजराती एनआरआय करणार भाजपाचा प्रचार

अहमदाबाद – पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावे अशी इच्छा असलेले 1000 अनिवासी भारतीय मायदेशी परतले असून ते भाजपचा प्रचार करणार आहेत. हे सर्व अनिवासी भारतीय मूळचे गुजरातचे असून ते सध्या गुजरातमधील वेगवेगळ्या भागांमध्ये प्रचार करत आहेत.

हे सर्व अनिवासी भारतीय गळ्यात फगवा स्कार्फ, सबका साथ सबका विकास असे लिहिलेल्या टोप्या आणि टी शर्ट घालून गावागावांत जाऊन लोकांच्या भेटी घेत आहेत. तसेच मोदींना मतदान केले की देशाची कशी प्रगती होईल हे सांगत आहेत. या सर्वांनी चाय पे चर्चासारखे कार्यक्रम देखील आयोजित केले असून मोदींच्या समर्थनार्थ रॅली काढत आहेत.

मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही देश बदलताना बघितला आहे. विकास सुरूच राहावा म्हणून आम्ही लोकांना भाजपसाठी मतदान करा, असे आवाहन करणार आहोत, असे नीरव पटेल यांनी सांगितले. पटेल हे शिकागोमधील आयटी कंपनीत कामाला आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.