भोर तहसीलसमोर भाजपचे उद्या धरणे आंदोलन

कापूरहोळ-भारतीय जनता पक्ष भोर तालुका व शहर यांच्या वतीने मंगळवारी (दि. 25) महाविकास आघाडी सरकाराच्या काळात गुन्हेगारांना धाक न राहिल्याने महिलांवरील अत्याचारात वाढ झाली आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी संदर्भात केलेली क्रूर चेष्टा याचा निषेध नोंदविण्यासाठी भोर तहसीलसमोर महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

यावेळी पश्‍चिम महाराष्ट्र संघटनमंत्री रवी अनासपुरे, भाजपचे पुणे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, संघटन सरचिटणीस सचिन सदावर्ते, बाळासाहेब गरुड सरचिटणीस यावेळी उपस्थित राहणार आहेत. तरी सर्व कार्यकर्ते, नागरिकांनी मोठ्या संख्येने धरणे आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन भाजपचे भोर तालुकाध्यक्ष जीवन कोंडे यांनी केले आहे.

नसरापूर (ता. भोर) येथे शनिवारी (दि. 22) आयोजित पत्रकार परिषदेत कोंडे यांनी ही माहिती दिली. कार्याध्यक्ष राजेंद्र मोरे,भोर शहराध्यक्ष सचिन मांडके, युवक अध्यक्ष अमर बुदगुडे, माजी नगराध्यक्ष दिपाली शेटे, विश्‍वास ननावरे, प्रदिप खोपडे, डॉ. नागेंद्र चौबे, कपिल दुसंगे, अशोक पांगारे, विजयकुमार वाकडे आदी यावेळी उपस्थित होते.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.