भिगवण-घरकुल योजनेपासुन वंचित असलेल्या कुटूंबांनी रमाई, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अर्ज करावेत. गोरगरीब जनतेचे घराचे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी शासन घरकुलांसाठी विविध योजना आहेत, याचा फायदा घ्यावा असे अवाहन जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर यांनी केले.
अकोले (ता. इंदापूर) येथे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर यांचे हस्ते पुजन करण्यात आले. याप्रसंगी सरपंच सुशिला शेंडगे, उपसरपंच वैष्णवी शिंदे, पंचायत समितीचे सहायक गटविकास अधिकारी विनायक गुळवे, ग्रामविकास अधिकारी सचिन पवार, युवराज कोकरे, वसंत शिंदे, कैलास वणवे, सतीश बंडगर आदी उपस्थित होते.