भाजपचे शतप्रतिशत यश साफ खोटे- धनंजय मुंडे

सत्तेचा गैरवापर करून विरोधी पक्षांच्या नेत्यांना फोडण्याचे प्रकार

बीड – सत्तेचा गैरवापर करून विरोधी पक्षांच्या नेत्यांना फोडण्याची एक अनिष्ठ राजकीय परंपरा महाराष्ट्रात भाजप-सेनेच्या सरकारने सुरू केली आहे. राष्ट्रवादीला गळती लागली आहे, असे म्हटले जात आहे. मात्र हा राजकीय भ्रष्टाचार आहे. हा राजकीय भ्रष्टाचार जर भाजप करत असेल तर तो सत्तेचा गैरवापर आहे, असे टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले.

एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मुंडे म्हणाले, भाजपचे शतप्रतिशत यश हेच आहे का? दुसऱ्या पक्षाचे आमदार किंवा इतर पदाधिकारी फोडणे याचाच अर्थ भाजप स्वतःला जे शत प्रतिशत समजते हे साफ खोटे आहे, असे मुंडे म्हणाले.
2014च्या निवडणुकीआधीही निवडून आलेले अनेक आमदार पक्ष सोडून गेलेले आहेत आणि ते गेल्याने राष्ट्रवादी पक्ष संपणार नाही. कुणी कुठल्या कारणाने आमच्या पदाधिकाऱ्यांवर दबाव टाकला हे येणाऱ्या काळात उघडकीस येईल. शिवसेना-भाजप ने जे काही आमिष दाखवून जे काही केले त्याने आम्हाला काही फरक पडणार नाही. या बरोबरच राष्ट्रवादी पक्ष हा पुरोगामी विचारांचा पक्ष आहे. महाराष्ट्रात हा पक्ष जमिनीवर पाय जखडून आहे, असे मत धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले.

आजपर्यंत असे राजकारण कुठल्याही राजकीय पक्षाने केले नव्हते. ते राजकारण आज भाजप-शिवसेना करत आहे. मात्र पुरोगामी महाराष्ट्रातील जनता हे खपवून घेणार नाही. भाजप-सेनेच्या कारकिर्दीत अनेक गंभीर भ्रष्ट्राचाराची प्रकरणे घडली आहेत. आघाडी सरकार आल्यास या भ्रष्ट नेत्यांवर कारवाई करण्यासाठी आम्हाला सत्तेचा गैरवापर करण्याचीही गरज राहणार नाही. परिस्थिती अशी होईल की त्या भ्रष्ट नेत्यांना एक दिवसही स्व:पक्षात राहणे अवघड होऊन जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)