खेड, (वार्ताहर)- आ.रोहित पवारांच्या विचारसरणीवर प्रभावित होऊन तालुक्यातील शिंपोरा, मानेवाडी येथील कार्यकर्त्यांनी भाजपाला रामराम करत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे.
आ. रोहित पवारांच्या उपस्थितीत बाबासाहेब (पिंटू) काळे, सतीश काळे, अमोल काळे, गोकुळ (विठ्ठल) कानगुडे, पोपटराव काळे या युवा कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आहे. गेली काही महिन्यांपासून आ.रोहित पवार आणि आ. राम शिंदे यांच्यात विकासकामांची स्पर्धा सुरू आहे. सध्या ही स्पर्धा शिगेला पोहोचली आहे.
कामांच्या या स्पर्धेत अनेक कार्यकर्त्यांनी नेत्यांच्या उत्कृष्ट कामाला महत्व देत आजपर्यंत सांभाळेल्या पक्षनिष्ठेला सुरुंग लावत पक्षप्रवेश केले आहेत. त्यात शिंपोरा-मानेवाडीकरांनीही उडी घेतली आहे. शिंपोरा येथे अनेक वर्षांपासून प्रलंबीत असलेल्या रस्त्यांचा प्रश्न सुटला आहे.
यातील खेड-शिंपोरा-मानेवाडी या मंजूर असलेल्या परंतु अर्धवट असलेल्या कामाला आ.रोहित पवारांमुळे पुन्हा गती मिळाली आहे.
या पक्षप्रवेशावेळी ज्येष्ठ नेते रामचंद्र भोसले, शिवाजी भोसले, हेमंत काळे, चेअरमन विठ्ठल माने, प्रशांत (पप्पू) गायकवाड, महेंद्र काळे, अमोल चव्हाण, राहुल भोसले, हभप. शरद महाराज काळे, अभिजीत काळे, शहाजी माने, पद्माकर काळे, अण्णासाहेब काळे, शरद खराडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.