कोलकाता – पतिवर्तन यात्रा थांबवल्याचा आरोप करत भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सुरक्षा रक्षकांवर लाठ्या काठ्यांनी हल्ला चढवला. या धुमश्चक्रीत पक्षाच्या नॉर्थ 24 परगणा जिल्ह्याच्या महिला आघाडी अध्यक्षा गंभीर जखमी झाल्या आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेने जारी केलेल्या व्हिडिओमध्ये हातात काठी घेतलेले भाजपा कार्यकर्ते बॅरिकेडमागे असणाऱ्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून जात असल्याचे दिसत आहे.
कांचरपारा ते उत्तर 24 परगणा अशी परिवर्तन यात्रा भाजपाने काढली होती. पोलिसांनी बॅरिकेड लावून ही यात्रा रोखली. त्यावेली भाजपा कार्यकर्त्यांनी बॅरिकेड मोडून यात्रा पुढे नेण्याचा प्रयत्न केला त्यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप केला तेंव्हा संघर्षाला सुरवात झाली.
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा यांच्या हस्ते परिवर्तन यात्रेला सुरवात झाली आहे. प. बंगालमध्ये भाजपाने तृणमूळ कॉंग्रेससमोर आव्हान उभे करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.