कोल्हापूर(प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टी कोल्हापूर महानगरचा कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग पन्हाळा येथे झाले. प्रशिक्षण वर्गासाठी विविध विषयांवर विविध वक्त्यांनी मार्गदर्शन केले.
भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य महेश जाधव, जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे, अशोक देसाई, दिलीप मेत्राणी, विजय जाधव, गणेश देसाई, हेमंत आराध्ये, विजयसिंह खाडे, गायत्री राउत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रतिमा पूजन, दीप प्रज्वलन झाले.
भाजपा पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे यांनी ‘महापालिका निवडणूक व्यवस्थापन’ या विषयावर मार्गदर्शन केले. माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी केंद्र सरकारच्या विविध योजनांवर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
सांगली ग्रामीण जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे-म्हैशाळकर यांनी २०१४ नंतर झालेले आमूलाग्र बदल याविषयावर मार्गदर्शन केले मुकुंद भावे यांनी संघ परिवाराचा इतिहास, निर्मिती याबाबतची महत्त्वपूर्ण माहिती विषद केली. किरण कर्नाड यांनी आपल्या बँकिंग क्षेत्रातील अनुभवांचे सांगत महाविकास आघाडी सरकारचे अपयश याबाबत मार्गदर्शन केले.
भाजपा प्रदेश सोशल मिडिया सहप्रमुख समीर गुरव यांनी प्रभावी सोशल मिडिया या विषयावर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी संघटन सरचिटणीस अशोक देसाई, विजय जाधव, गणेश देसाई, हेमंत आराध्ये, विजय आगरवाल, राजू मोरे, संजय सावंत, आजम जमादार, सुधीर देसाई यांनी विशेष परिश्रम घेतले.