श्रीनगर – भाजपचे बंदिपोरा जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष शेख वासीम बारी आणि त्यांच्या मुलाची तसेच भावाची हत्या करण्याचा प्रकार अलीकडेच घडला आहे. या पार्श्वभूमीवर काश्मिरातील आणखी
एका भाजप कार्यकर्त्याचे संशयित दहशतवाद्यांनी अपहरण केले आहे. मेहराजुद्दीन मल्ला असे या भाजप कार्यकर्त्याचे नाव असून ते एका नगरपालिका समितीचे उपाध्यक्ष आहेत.
बारामुल्ला जिल्ह्याच्या रफियाबाद भागातून त्यांचे अपहरण करण्यात अले. ते सोपोरला जात असताना काही जणांनी त्यांना जबरदस्तीने पळवून नेले. या प्रकरणी त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दिली असून पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे.
त्यांचा अजून काहीच ठावठिकाणा कळालेला नाही. पण काही दहशतवादी संघटनांकडूनच त्यांचे अपहरण करण्यात आले असावे असा कयास आहे. काश्मिरात गेल्या काही दिवसांपासून दहशतवाद्यांनी आता भाजप कार्यकर्त्यांना लक्ष करायची भूमिका घेतली आहे असे दिसून आले आहे.